चक्रीवादळग्रस्तांना दिलासा, मदतीच्या निकषांमध्ये बदल

Update: 2020-06-11 02:39 GMT

निसर्ग चक्रीवादळाचा ( Nisarga Cyclone) फटका बसलेल्या व्यक्तींना एनडीआरएफ आणि एस.डी.आर.एफचे दर बाजूला ठेऊन वाढीव मदत करण्यासाठी सरकारने विशेष बाब म्हणून निकषात बदल केल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी दिली आहे. वादळानंतर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहेत.

तत्पूर्वी रायगडसाठी (Raigad) १०० कोटी, रत्नागिरीला (Ratnagiri )७५ कोटी आणि सिंधुदूर्गला (Sindhudurg)२५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. नुकसान भरपाईचे निकष बदलण्याची गरज असल्याने तशा सुचना विभागाला देण्यात आल्या होत्या, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा...


राज्यातील मंत्री आणि मुख्य सचिवांचा संघर्ष शिगेला, मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी

मुख्य सचिव अजॉय मेहतांवर अशोक चव्हाण यांची नाराजी

राज्यातील हा जिल्हा कोरोनामुक्त !

अरविंद बनसोड मृत्यू प्रकरणाच्या चौकशीबाबत सरकारचा निर्णय

मदतीच्या निकषांमध्ये कोणते बदल करण्यात आले?

१. पक्क्या- कच्च्या घराच्या नुकसानीसाठी पूर्वी ९५ हजार १०० रुपयांची नुकसान भरपाई दिली जात होती, ती आता १ लाख ५० हजार इतकी वाढवण्यात आली आहे.

२. बहुवार्षिक पिकांच्या नुकसान भरपाईसाठी पूर्वी हेक्टरी १८ हजार रुपयांची नुकसानभरपाई दिली जात होती. आता ती वाढवून ५० हजार रुपये इतकी करण्यात आली आहे. ही नुकसानभरपाई २ हेक्टरपर्यंतच्या मर्यादेत मिळेल

३. अंशत: पडझड झालेल्या घरांसाठी पूर्वी ६ हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली जात होती, ती आता १५ हजार रुपये इतकी करण्यात आली आहे.

४. कच्च्या घरांच्या अंशत: नुकसानीपोटी पूर्वी ६ हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली जात होती ती आता १५ हजार रुपये इतकी वाढवण्यात आली आहे.

५. नष्ट झालेल्या झोपडीसाठी पूर्वी ६ हजार रुपये दिले जात असत, आता ही रक्कम वाढवून १५ हजार इतकी करण्यात आली आहे.

६. गावात लहान मोठी दुकाने, टपरीचे व्यवसाय करत असलेल्या लोकांना नुकसानीच्या ७५ टक्के किंवा जास्तीत जास्त १० हजार रुपयांपर्यंत मदत देण्यात येईल.

७. ज्यांची घरे पूर्णत: उध्वस्त झाली आहेत त्यांना प्रति कुटुंब कपड्यांसाठी पूर्वी २५०० रुपये तर २५०० रुपये भांडीकुंडी यासाठी दिले जात होते. आता विशेष बाब म्हणून ही मदत प्रती कुटुंब प्रत्येकी ५ हजार अशी करण्यात आली आहे.

दरम्यान चक्रीवादळाने रायगड-रत्नागिरी टमध्ये वीजेचे खांब कोसळले आहेत, ते उभारण्याचे काम सुरु आहे. वीज पुरवठा सुरळित करण्यासाठी इतर जिल्ह्यातील तांत्रिक मनुष्यबळ तिथे नियुक्त करण्यात आले आहे. येथील वीजपुरवठा सुरळित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

Similar News