युक्रेन-रशिया युद्ध, सोन्यामध्ये गुंतवणूक करणे योग्य आहे का?

Update: 2022-02-24 09:01 GMT

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युक्रेननेही प्रत्युत्तर दिले आहे. एकीकडे हे युद्ध सुरू होताच कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. अमेरिकी डॉलरच्या तुलनेच भारताच्या रुपयाचे मुल्य देखील घटले आहे. युक्रेन आणि रशिया दरम्यान युद्ध सुरू होताच सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. जळगावमध्ये सराफा बाजार उघडल्यानंतर काही वेळातच युद्धाला सुरुवात झाल्याची माहिती आल्याने सोन्याचे भाव प्रति दहा ग्रॅममागे 51 हजार 800 रुपयांवर पोहचले आहेत. या युध्दाचा परिणाम आतंरराष्ट्रीय शेअर बाजार तसेच मुंबई शेअर बाजारावर झाला. सेन्सेक मोठ्या प्रमाणात गडगडला. भारतीय रुपयाही 50 पैशांनी स्वस्त झाला आहे. तर सोन्याचे भाव मात्र वाढले आहे.

हे युद्ध असेच सुरू राहीले तर 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा 55 हजारांपर्यंत जातील असा अंदाज जळगाव सराफ असोसिएशनचे सचिव तसेच स्वरूपकुमार लुंकड यांनी व्यक्त केला आहे मात्र युद्ध संपताच हे भाव त्याच वेगाने खालीही येतील असंही मत त्यांनी व्यक्त केले आहे. यामुळे सोन्याची खरेदी किंवा गुंतवणूक करतांना ग्राहकांनी काळजी घ्यावी असा सल्लाही लुंकड यांनी दिला आहे.

Tags:    

Similar News