गोडसेचा पुजारी कॉंग्रेसमध्ये...

कॉंग्रेस भविष्यात प्रज्ञा ठाकुरला प्रवेश देणार का? कॉंग्रेस नेत्याचा सवाल

Update: 2021-02-27 05:07 GMT

नथुराम गोडसेचं मंदीर ज्या आमदाराच्या मतदार संघात तयार झालं. त्या आमदाराने कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. एकीकडे कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते नथुराम गोडसे वरुन भाजप आणि आरएसएस वर नेहमीत निशाणा साधत असतात. मात्र, महात्मा गांधींचा मारेकरी असणाऱ्या नथुराम गोडसेचं मंदीर ज्या आमदाराच्या मतदार संघात तयार झालं... अशा आमदाराला कॉंग्रेस पक्षात प्रवेश दिल्यानं कॉंग्रेसमध्येच वाद निर्माण झाला आहे.

त्यामुळं आता महात्मा गांधींच्या मारेकऱ्याच्या भक्ताला कॉंग्रेसमध्ये प्रवेश कसा दिला गेला. असा सवाल भाजपही उपस्थित करत आहे. या संदर्भात भाजप नेते विश्वास सारंग यांनी हे मोठं दुर्भाग्य असल्याचं म्हटलं आहे.

मध्य प्रदेश च्या ग्वालियरच्या वार्ड क्रमांक 44 चे आमदार आणि हिंदू महासभेचे नेते बाबूलाल चौरसिया यांनी माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

यावर मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी प्रतिक्रिया देताना हा बाबूलाल कोण आहे? ज्या विचारधारेने महात्मा गांधींची हत्या केली. ती आजही जिवंत आहे. आम्हाला लाज वाटते. अशा शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे.

तर दुसरीकडे माजी केंद्रीय मंत्री अरुण यादव ने भविष्यात भोपाळ येथील खासदार प्रज्ञा ठाकुर जर कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असेल तर तिला कॉंग्रेसमध्ये प्रवेश देणार का? असा सवाल केला आहे. या संदर्भात एनटीव्ही ने वृत्त दिलं आहे.

Tags:    

Similar News