COVID0-19चा कहर, जगातील रुग्णसंख्या १० लाखांच्यावर

Update: 2020-04-03 03:18 GMT

कोरोनाबाधितांची जागतिक संख्या १० लाखांच्यावर पोहोचली असून मृतांचा आकडा आता ५० हजारांच्या वर पोहोचला आहे. तर जगात सर्वाधिक रुग्ण सध्या एकट्या अमेरिकेत असून अमेरिकेतील मृतांचा आकडा ५० हजारांच्यावर पोहोचला आहे.

तर कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख २६ हजारांवर पोहोचला आहे. तर स्पेनमध्ये गुरूवारी एका दिवसात ९५६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे स्पेनमधील एकूण मृतांची संख्या आता १० हजारांच्यावर पोहोचली आहे. चीनमधून कोरोनाचा उद्रेक झाला असला तरी कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्यात चीनला यश मिळालं आहे.

मात्र आता कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिका, इटली, स्पेन, ब्रिटन यांना बसला आहे. जगातील सर्वाधिक कोरोना मृत्यू हे इटलीमध्ये झाल असून इटलीतील मृतांची संख्या आता १३ हजार १५७ वर पोहोचली आहे.

Similar News