अमेरिकेत कोरोनाबाधीत रुग्णांचा आकडा 2 लाखांच्यावर

Update: 2020-04-02 00:18 GMT

जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलाय. अमेरिकेत कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या बुधवारी 2 लाख 3 हजार 608 वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या 4 हजार 447वर पोहोचली आहे. चीनमधून कोरोनाचा उद्रेक झाला असला तरी चीनपेक्षा इतर देशांना या कोरोनाचा मोठा फटका बसला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार जगभरात बुधवारी संध्याकाळपर्यंत कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 8 लाख 27 हजार 419 वर पोहोचली आहे, तर मृतांची संख्या 40 हजार 777 झाली आहे, आता 205 देशांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला आहे. कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढल्याने आता रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत आता या देशांच्या यादीत ३५व्या क्रमांकावर आला आहे.

Similar News