विकासदर ४.५ टक्क्यांवर; गत सहा वर्षातील सर्वात निचांकी दर

Update: 2019-11-29 16:52 GMT

केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०१९-२० च्या दुसऱ्या तिमाहीतला विकासदर (GDP Falls) जाहीर केला आहे. या आकडेवारीनुसार भारताचा विकासदर कोसळला असून तो ४.५ टक्क्यांवर आला आहे. गेल्या सहा वर्षातील सर्वात निचांकी दर आहे.

केंद्र सरकारच्या अखात्यारीतील केंद्रीय सांख्यिकी कार्यालयानं जीडीपीबाबतची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. विकास दरात गेल्या सलग पाचव्या तिमाहीत घट झालेली आहे. दुसऱ्या तिमाहीत बांधकाम क्षेत्रात ८.५ टक्क्यांवरुन ३.३ टक्के, मायनिंगमध्ये ०.१ टक्के, उत्पादन क्षेत्र ६.९ टक्क्यांवरुन १% , सर्व्हिस सेक्टर ७.३ % वरुन ६.८% पर्यंत घट झाली आहे.

देशाच्या विकास दरात सातत्याने घसरण होत असून बेरोजगारीचं प्रमाण वाढत आहे. अनेक क्षेत्रांत कर्मचारी कपातही सुरु झालीय. बँकिंग आणि गृहनिर्माण क्षेत्र अडचणीत आहे. बांधकाम क्षेत्राला आर्थिक मंदीचा जोरदार फटका बसला आहे.

Similar News