दाऊदचा जुना हस्तक गँगस्टर एजाज लकडावाला मुंबई पोलिसांच्या जाळ्यात

Update: 2020-01-09 10:12 GMT

दाउदचा एकेकाळचा हस्तक आणि गँगस्टर एजाज लकडावाला याला बिहारच्या पाटणा येथून मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबई पोलीस त्याच्या मागावर होते. ही माहीती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.

एजाज लकाडावाला याने दाऊद, छोटा राजन, छोटा शकील यांसोबत काम केलंय. यांच्यापासून विभक्त झाल्या नंतर त्याने स्वतंत्र काम सुरू केलं. एजाज लकडावाला या गँगस्टरविरोधात तब्बल 26 गुन्हे, चार मोक्का आणि 80 तक्रारी दाखल आहेत. तर राज्यभरातही अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.

Similar News