घरात घुसून मारू असं म्हणत सत्तेत आलेली व्यक्ती म्हणते, घरात कुणी घुसलंच नाही: कन्हैया कुमार

Update: 2020-06-20 13:47 GMT

“घरात घुसून मारू असं म्हणत सत्तेत आलेली व्यक्ती आपले २० जवान शहीद झाल्यानंतर म्हणतेय की घरात कुणी घुसलंच नाही,’’ असं म्हणत कन्हैया कुमारनं मोदींवर तोफ डागली आहे.

https://twitter.com/kanhaiyakumar/status/1274281685631111174

लडाखमधील गलवान खोऱ्यात चीनच्या हल्ल्यात भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षांनी चीन ने आपला भूभाग बळकावला असल्याचा दावा केला होता.

या संदर्भात मोदी यांनी आपल्या सीमाभागात कोणीही घुसले नसून आपली कोणतीही पोस्ट शत्रूच्या ताब्यात नाही. लडाखमध्ये आपले 20 वीर जवान शहीद झाले. मात्र, ज्यांनी भारत मातेकडे डोळे करुन पाहिलं त्यांना धडा शिकवून ते गेले. डेप्लॉयमेंट, कारवाई आणि प्रत्युत्तर देण्यासह देशाच्या संरक्षणासाठी जे करायला हवं ते आपलं सैन्य करत असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली होती.

यावरच कन्हैया कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना

“घरात घुसून मारू असं म्हणत सत्तेत आलेली व्यक्ती आपले २० जवान शहीद झाल्यानंतर म्हणतेय की घरात कुणी घुसलंच नाही,’’

असं ट्विट करत मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.Full View

Similar News