आता लॉकडाऊन हाच पर्याय, राहुल गांधी मोदी सरकार संतापले

Update: 2021-05-04 06:30 GMT

कोरोनाशी लढण्यात अपयशी ठरलेल्या भारत सरकारला आता कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी लॉकडाऊनचा सल्ला दिला आहे. गेल्या काही दिवसात देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशा परिस्थितीत ऑक्सिजन आणि कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळं देशात हजारो रुग्णांचा मृत्यू होत आहे.

त्यातच लसीकरणाबाबत भारत सरकारचा विशेष प्लान देखील समोर आलेला नाही. आत्तापर्यंत देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 2 ते 3 टक्के लोकांनीच कोरानाची लस घेतल्याचं समोर आलं आहे. अशा परिस्थिती कोरोनाचे दोनही डोस नागरिकांना मिळायला काही वर्ष लागतील असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळं ना लस आहे ना ऑक्सिजन त्यामुळं लोकांचे वाचवण्यासाठी आता लॉकडाऊन गरजेचं असल्याचं मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

दरम्यान गेल्या वर्षी लॉकडाऊनचा विरोध करणाऱ्या राहल गांधी यांनी आता लॉकडाऊन लावा. अशा सूचना सरकारला केल्या आहेत.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीट मध्ये केंद्र सरकारवर कोरोनाच्या परिस्थितीवर निशाणा साधताना

भारत सरकारच्या लक्षात येत नाही की, अशा परिस्थितीत कोरोनाचं संक्रमण थांबवण्याचा एकमेव मार्ग लॉकडाऊन आहे. भारत सरकारच्या निष्क्रियतेमुळे अनेक निरपराध लोकांचा जीव जात आहे.

Tags:    

Similar News