आमदारकीचं तिकीट नाकारणारा शिवसेनेचा वाघ गेला; माजी आमदार आर.एम .वाणी. याचं निधन
शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि वैजापूरचे माजी आमदार आर.एम. वाणी याचं आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने वैजापूर तालुक्यात शोकाकुल वातावरण पाहायला मिळत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आपली वेगळी छाप पाडणाऱ्या आमदारांपैकी वाणी यांची ओळख समजली जात होती.
शिवसेनेचा गड असलेल्या वैजापूर तालुक्यात गेल्यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत वाणी यांनी स्वतःहुन आमदारकीचा तिकिट नाकारलं होतं. विशेष म्हणजे कार्यकर्ते आणि अनेक नेते त्यांची दोन दिवस समज काढत होते, पण आता इतरांना संधी मिळावी असं म्हणत त्यांनी उमेदवारी नको म्हणून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंना कळवलं होते.
वाणी यांच्या निधनाची बातमी समजताच कार्यकर्त्यांनी वाणी यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी केली आहे. तर आज सकाळी 11 वाजता वैजापूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.