तिसरी लाट रोखण्यासाठी कोरोना निर्बंधाचे पालन करा- पालकमंत्री एकनाथ शिंदे

Update: 2021-08-31 11:45 GMT

मुंबई :  तिसरी लाट रोखण्यासाठी कोरोना निर्बंधाचे पालन करा असं आवाहन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना केलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजनची सर्वांधिक गरज भासली. उत्पादनापेक्षा मागणी जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आता मात्र जिल्हा नियोजन विकास निधी आणि नगरविकास विभागाच्या माध्यमातून मुंबई महानगर परिसरातील महापालिकांमध्ये ऑक्सिजन निर्मितीचे पीएसए प्लांट उभारले आहेत. त्यामाध्यमातून गरजू रुग्णांना ऑक्सिजन पुरविण्यासाठी मदत होईल. असं त्यांनी म्हटले आहे.

सध्या कोरोना रुग्ण संख्येत वाढ होताना दिसून येत असल्याचे सांगत संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी नागरिकांनी कोरोना निर्बंधाचे पालन करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

सोबतच सण उत्सव साजरे करण्यासाठी केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो नाविलाज म्हणून म्हणून बंधन घालत आहे. दही हंडी उत्सव असो की इतर सण उत्सव यामुळे गर्दी होऊन कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने टास्क फोर्सने काही नियम घालून दिले आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील सहकार्य करण्याची गरज आहे असं शिंदे म्हणाले. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिकचा धोका होण्याची शक्यता आहार त्यामुळे सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.

Tags:    

Similar News