अर्थमंत्री आज काय घोषणा करणार?

Update: 2020-05-17 03:20 GMT

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सलग पाचव्या दिवशी पत्रकार परिषद घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन विविध क्षेत्रांसाठी या पॅकेजमधून घोषणा करत आहेत. या टप्प्यातील अखेरची पत्रकार परिषद त्या आज सकाळी 11 वाजता घेणार आहेत. आतापर्यंत 4 टप्प्यांमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदांमध्ये अर्थमंत्र्यांनी कोळसा उत्पादनाच्या खासगीकरणापासून ते मुलभूत सोयी सुविधांसाठी 50 हजार कोटींची तरतूद करण्याची घोषणा केली आहे. त्याआधी लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. बांधकाम क्षेत्राला दिलासा देण्यासाठी सरकारने रेरामधील तरतुदी, कर्ज याबाबत सवलती जाहीर केल्या आहेत.

कृषी क्षेत्रासाठीही अर्थमंत्र्यांनी पॅकेजअंतर्गत घोषणा केली आहे. त्यामुळे आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणखी काय घोषणा करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Similar News