कोरोना रुग्णांची माहिती RSSला दिल्याचा आरोप, मानवी हक्कांच्या उल्लंघनाची तक्रार

Update: 2020-08-20 03:51 GMT

कोरोनाच्या (corona) रुग्णांची माहिती RSS चे कार्यकर्ते आणि संघाच्या लोककल्याण समितीला देण्यात आल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. नागपूर महापालिका उपायुक्त व RSS च्या लोक कल्याण समितीचे सुमधुर गोखले (Sumadhur Gokhale) यांच्यावर हा आरोप करण्यात आला आहे. राज्य मानवी हक्क आयोगापुढे मुंबई (mumbai) येथे आज सुनावणी होोणा आहे. तक्रारदार संदेश सिंगलकर(SANDESH SINGALKAR) नागपूर कॉग्रेसचे (Congress)प्रवक्ते असून ते सध्या प्रकृतीच्या कारणास्तव घरीच आहेत. रुग्णांची नावे आणि फोन नंबर असा डेटा लिक होण्याबाबतची ही पहिलीच याचिका आहे.

नागपूर महानगपालिकेच्या उपायुक्तपदी असलेल्या राम जोशी (ram joshi) यांनी निवडक पद्धतीने हा वैद्यकीय माहितीचा डेटा संघाच्या कार्यकर्त्यांना व त्यांच्या लोक कल्याण समितीला दिला, मदत करण्याचा निमित्ताने राजकीय दृष्टीने प्रस्थापित होण्याचे षडयंत्र यामध्ये आहे. रुग्णाच्या परवानगी शिवाय त्याची वैद्यकीय माहिती लिक करणे म्हणजे त्यांच्या खाजगीपणाच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे, असे याचिकाकर्त्याचे वकील असीम सरोदे (Asim Sarode) यांनी सांगितले आहे.

राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सय्यद यांच्यापुढे याप्रकरणाची आज 11 वाजता सुनावणी होणार आहे.

रुग्णाला आरोपींनी प्रत्येकी एक रुपया नुकसान भरपाई द्यावी, ते पुन्हा रुग्णांच्या मानवीहक्क व खाजगीपणाच्या हक्कांचे उल्लंघन करणार नाहीत, असा लेखी माफीनामा त्यांनी सादर करावा, नागपूर मनपा उपायुक्त राम जोशी, उपायुक्त प्रकाश वरखडे, मुख्य आरोपी लोक कल्याण समितीचे सुमुधुर गोखले यांच्या कॉल डिटेल रेकॉर्ड्सची माहिती घ्यावी, पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या चौकशी समितीने या प्रकरणाचा तपास करून अहवाल दाखल करण्याचे निर्देश द्यावेत, अशा मागण्या याचिकाकर्ते संदेश सिंगलकर यांनी केल्या आहेत.

Similar News