कुर्ल्यात उद्रेक! मुलीला न्याय मिळाला नाही म्हणून बापानं केली आत्महत्या..

Update: 2019-10-22 10:15 GMT

मुंबईतील कुर्ला परिसरातील पंचाराम रिठाडिया यांनी आपल्या १६ वर्षाच्या मुलीचं अपहरण झाल्याप्रकरणी सहा ते सात महीन्यांपासुन पोलीस खात्याकडून शोध घेण्यात सहकार्य मिळत नसल्याने आत्महत्या केली आहे. याचा विरोध दर्शवण्यासाठी नेहरू नगर परिसरातील हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

पंचाराम रिठाडिया सात दिवसांपुर्वी आत्महत्या केली असुन आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रचंड जसमुदाय रस्त्यावर उतरला होता.

अपहरण केलेल्या संशयितांकडून तक्रार न करण्याची धमकी देण्यात आली असून कुटुंबातील इतर दोन मुलींनाही उचलण्याची धमकी दिली जात असल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे.

संतप्त आंदोलनकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला असून या प्रकरणाची दाहकता एका बापाने प्राण गमावल्यानंतर वाढत आहे. काल संध्याकाळीही १५ ते १६ वर्षांच्या मुलांनी कँडल मार्च काढला होता. मात्र, या मार्चलाही पोलिसांकडून पांगवण्यात आलं होतं. संबंधित विषयाचं कव्हरेज करताना 'मॅक्समहाराष्ट्र'च्या पत्रकारांनाही मारहाण करण्यात आली आहे.

या प्रकरणामुळे राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मात्र अपहृत मुलीचा शोध लागाणार का ? हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/439747736671262/

 

 

 

Similar News