पीक कर्जासाठी शेतकऱ्यांचे हाल, पंतप्रधानांकडे किडनी विकण्यासाठी परवानगीची मागणी

Update: 2021-06-18 11:38 GMT

राज्यात एकीकडे सर्वत्र चांगला पाऊस होत असल्याने आता शेतकऱ्यांची पेरणीसाठी धावपळ सुरू झाली आहे. पण दुसरीक़डे काही शेतकऱ्यांना ते आर्थिक अडचणीमुळे शक्य होत नाहीये. बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्य सरकारने दखल घेतली नसल्याने पाच शेतकऱ्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे किडनी विकण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवेदन पाठवण्यात आले आहे.

मलकापूर तालुक्यातील वाकोडी येथील पाच शेतकऱ्यांवर पंचवीस हजार ते एक लाख रुपयांपर्यंत थकीत कर्ज असल्याने बँकांनी कर्जाचे पुनर्गठन करण्यास नकार दिल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पीक कर्ज मिळत नसल्याने खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाहीये. अशा परिस्थितीमध्ये सरकारने कर्ज पुनर्गठन करण्यासंदर्भात बँकांना आदेश द्यावेत अन्यथा किंवा किडनी विकण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पाच शेतकऱ्यांनी गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

मात्र यासंदर्भात सरकारकडून किंवा अधिकाऱ्यांकडून कुठलीच दखल घेतली गेली नाही, असे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अखेर या शेतकऱ्यांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे किडनी विकण्याची परवानगी मागितली आहे. या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठवले आहे.

Tags:    

Similar News