शेतकरी आंदोलन: सर्वोच्च न्यायालय चिंतीत

शेतकरी आंदोलनाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली... नक्की काय घडलं न्यायालयात वाचा...

Update: 2021-01-06 08:16 GMT

गेल्या 43 दिवसांपासून थंडी, वारा, पावसात दिल्लीच्या सीमेवर तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या या कायद्यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. आज सर्वोच्च न्यायालयाने तीन कृषी कायद्याबाबत दाखल केलेल्या याचिकांबाबत सुनावणी करताना शेतकरी आंदोलनाबाबत सर्वोच्च न्यायालयाने परिस्थिती जैसे थेच असल्यानं चिंता व्यक्त केली.

सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी आम्ही परिस्थिती समजून घेतो. आम्हाला वाटतं हा प्रश्न चर्चेने सुटावा. तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी एक याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने यावेळी याचिकाकर्ता एमएल शर्मा यांना न्यायालयात शेतकरी आंदोलनाबाबत काय सुरू आहे. याची तुम्हाला माहिती आहे का? असा सवाल केला असता.... याचिकाकर्ता शर्मा यांनी सुधारीत याचिका दाखल केल्याचं न्यायालयाला सांगितलं.

त्यानंतर सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी भारताचे महाधिवक्ता तुषार मेहता यांना शेतकरी आंदोलनाबाबत कधी सुनवाई होणार आहे. असा सवाल केला असता. तुषार मेहता यांनी अद्यापर्यंत तारीख ठरली नसल्याचं सांगितलं. तसंच या संदर्भातील दुसऱ्या याचिकांची या सोबत सुनवाई करू नये. अशी सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली.

त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी अद्यापर्यंत शेतकरी आंदोलनाबाबत कोणताही निर्णय झाला नाही. असं सांगितलं. तसंच येत्या सोमवारी म्हणजे 11 जानेवारीला शेतकरी कायदा आणि शेतकरी आंदोलनासंदर्भातील सर्व याचिकांवर एकत्र सुनवाई होईल. असं न्यायालयाने आज सांगितलं.

Tags:    

Similar News