#FarmersParliament : शेतकऱ्यांची आज दिलीत धडक, कडक बंदोबस्त

Update: 2021-07-22 03:13 GMT

केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू करुन आता 8 महिने झाले आहेत. पण केंद्र सरकार कायदे मागे घेण्यास तयार नसल्याने शेतकऱ्यांनीही आंदोलन मागे घेण्यास नकार दिला आहे. आता संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी दिल्लीत धडक देण्याचा निर्णय़ घेतला आहे. आज जंतर मंतर इथे शेतकरी संसद भरवली जाणार आहे. यासाठी दिल्लीच्या विविध सीमांवर आंदोलनाला बसलेले अनेक शेतकरी यासाठी दिल्लीत जाणार आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलाच्या पार्श्वभूमीवर टिकरी बॉर्डरवर कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे.

जोपर्यंत सरकार कायदे मागे घेत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच राहिल, अशी माहिती शेतकऱ्यांचे नेते राकेश टिकैत यांनी दिली आहे. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत हे सिंगू बॉर्डरवर पोहोचले आहेत. सिंगू बॉर्डरवरुन इतर शेतकऱ्यांसोबत आपण जंतर मंतर येथे जाणार आहोत, त्यानंतर तिथे किसान संसद भरवली जाणार आहे, अशी माहिती राकेश टिकैत यांनी दिली आहे. सरकार कायदे मागे घेईल पण त्याला वेळ लागेल, त्यामुळे आम्ही आंदोलनन सुरूच ठेवणार आहोत, असेही राकेश टिकैत यांनी स्पष्ट केले आहे. 26 जानेवारी रोजी दिल्लीत शेतकरी आंदोलना दरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आता दिल्ली पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. आम्ही संसदेच्या कामकाजाकडे लक्ष ठेवून आहोत.

*आंदोलक शेतकऱ्यांसाठी अटी*

दिल्ली पोलिसांनी केवळ 200 शेतकऱ्यांना जंतर मंतर येथे सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेत आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. सिंघू बॉर्डरवरुन शेतकऱ्यांना बसमध्ये घेऊन पोलीस बंदोबस्तात जंतर मंतर येथे नेले जाणार आहे. केवळ ओळखपत्र असलेल्या शेतकऱ्यांना जंतर मंतर येथे प्रवेश दिला जाणार आहे. तसेच आंदोलनाची वेळ संपल्यानंतर पोलीस या शेतकऱ्यांना पुन्हा सिंघू बॉर्डरवर सोडणार आहेत.

Similar News