आता फेसबुकवर चालवा ‘दुकान’ !

Update: 2020-05-20 10:13 GMT

कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण जग ठप्प झालेले असताना छोट्या व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसला आहे. पण आता या व्यावसायिकांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी आता फेसबुकने ऑनलाईन विक्रीसाठीचे फीचर एड केले आहे. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी ही माहिती दिली आहे. छोट्या व्यावसायिकांना आता फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर आपली उत्पादनं विकता येणार आहेत.

ऑनलाईन खरेदी-विक्रीमुळे व्यवसाय वाढून या छोट्या उद्योजकांना त्याचा फायदा मिळेल असे झुकरबर्ग यांनी म्हटले आहे. ज्या विक्रेत्यांनी याआधी कधीही ऑनलाईन विक्री केली नव्हती ते मोठ्या प्रमाणात या सोयीचा फायदा घेऊ शकतील असेही फेसबुकतर्फे सांगण्यात आले आहे.

वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फेसबुकने shoppyfi,Bigcommerce आणि woo या कंपन्यांसोबत करार केला आहे. ही ऑनलाईन दुकानं त्यांच्या फेसबुक पेजवर आणि इन्स्टाग्राम प्रोफाईलवर पाहता येतील. त्याचबरोबर फेसबुकवरील जाहिराती आणि बातम्यांच्या माध्यमातूनही त्यांना आपल्या उत्पादनाची जाहिरात करता येणार आहे.

Similar News