सांगा कुठयं महागाई? सदाभाऊंचे धाडसी वक्तव्य

मला सांगा, सोनं २० हजार रुपये तोळ्यावरून ५० हजारांवर गेलं. पण लोक सोनं खरेदी करतायतच. महागाई वाढली म्हणून लोकांनी दारू पिणं सोडलं का? उलट कांदा, डाळीच्या किमती वाढल्या तर शेतकरी सुखी होईल, महागाईचा फायदा शेतकऱ्यांना होईल, असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.

Update: 2022-05-10 03:22 GMT


इतर कोणताही पक्ष महागाईचे समर्थन करण्याचं धाडस करणार नाही. पण मी ते धाडस करतो. कुठे आहे महागाई? मला सांगा. सोनं २० हजार रुपये तोळ्यावरून ५० हजारांवर गेलं. पण लोक सोनं खरेदी करतायतच. महागाई वाढली म्हणून लोकांनी दारू पिणं सोडलं का? उलट कांदा, डाळीच्या किमती वाढल्या तर शेतकरी सुखी होईल, महागाईचा फायदा शेतकऱ्यांना होईल.

देशात सध्या पेट्रोल-डिझेलपासून सर्वच गोष्टींच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्यांचं बजेट कोलमडलं आहे. नुकतीच घरगुती सिलेंडरच्या दरातही वाढ करण्यात आली. त्यामुळे आता सिलेंडर हजार रुपयांवर पोहोचला आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचा खिसा रिकामा होत आहे. अशा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी या महागाईचं समर्थन केलं आहे.

चाळीसगाव इथं माध्यमांशी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, इतर कोणताही पक्ष महागाईचे समर्थन करण्याचं धाडस करणार नाही. पण मी ते धाडस करतो. कुठे आहे महागाई, मला सांगा. सोनं २० हजार रुपये तोळ्यावरून ५० हजारांवर गेलं. पण लोक सोनं खरेदी करतायतच. महागाई वाढली म्हणून लोकांनी दारू पिणं सोडलं का? उलट कांदा, डाळीच्या किमती वाढल्या तर शेतकरी सुखी होईल, महागाईचा फायदा शेतकऱ्यांना होईल.

वाढत्या महागाईमुळे सध्या सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत वाढ झाल्यानंतर काही दिवसांतच घरगुती सिलेंडरच्या किमतीतही ५० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सिलेंडरचे दर ९९९.५० रुपये झाले आहेत. खाद्यतेलासह पेट्रोल-डिझेलचेही भाव सतत वाढत आहेत. हॉटेलमध्ये खाणंपिणंही त्यामुळे महागलं आहे.

Tags:    

Similar News