चीनविरोधात रणनीतीसाठी जागतिक पातळीवर हालचाली

Update: 2020-06-17 03:12 GMT

भारत आणि चीन दरम्यान पुन्हा एकदा मोठा तणाव निर्माण झाला असताना जागतिक पातळीवर चीनविरोधात रणनीती तयार करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. युरोपीय महासंघ आणि अमेरिका यांनी आता एकत्र येऊन चीनचे आक्रमक धोरण आणि मनसुबे हाणून पाडण्यासाठी रणनीती आखण्याचे आवाहन युरोपीय महासंघाचे प्रमुख अधिकारी जोसेफ बोरेल यांनी केले आहे.

"आपली मूल्य आणि हित जपण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे" असे त्यांनी युरोपीय युनियनचे परराष्ट्रमंत्री आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांच्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत म्हटले आहे. उर्वरित आशियाशी चांगले संबंध राहतील आणि चीनविरोधात कडक भूमिका घेता येईल असे एक ठोस धोरण तयार करण्याचे आवाहन त्यांनी केेलेे आहे.

दरम्यान अमेरिकेने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तर जर्मनीचे परराष्ट्र मंत्री हाय मास यांनी चीनने जागतिक पातळीवर पारदर्शकतेचे पालन केले पाहिजे असे म्हटले आहे. यावेळी त्यांनी चीनकडून कोरोनाबाबत सुरूवातीच्या टप्प्यात माहिती लपवली गेल्याचाही उल्लेख केला.

Similar News