कामगार कायद्यांविरोधात देशव्यापी आंदोलन

Update: 2020-11-26 09:02 GMT

केंद्र सरकारने कामगार कायद्याविरोधात केलेल्या बदलांविरोधात देशातील कामगार संघटनांनी केंद्र सरकारविरुद्ध आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. संविधान दिनी देशातल्या अनेक कामगार संघटनांनी केंद्र सरकारविरोधात देशव्यापी आंदोलन केले. तसेच शेतीशी संबंधित तीन महत्वाचे कायदेही मोदी सरकारने नुकतेच मंजूर केले आहे. त्यामुळे नाराज असलेल्या शेतकरी संघटनांनीही या बंदला पाठिंबा दिला आहे. देशातल्या दहा केंद्रीय कामगार संघटना तसेच 35 फेडरेशन यात सहभागी झाल्या आहेत.

राज्यातल्या विविध भागात हे आंदोलन करण्यात आले. दादरच्या कोतवाल उद्यानात डाव्या आघाडीच्या आयटकच्या कामगार संघटनांनी निदर्शनं केली. या आंदोलनात महिलांची संख्या लक्षणीय होती आणि घरकाम करणाऱ्या महिला संघटनेच्या सदस्यांचा यात जास्त सहभाग दिसला. प्रकाश रेड्डी यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.

Tags:    

Similar News