अबब ! बीड जिल्हा परिषदेच्या ११२ शाळांचा वीजपुरवठा खंडीत

Update: 2023-08-11 06:56 GMT

 देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची हेळसांड होताना दिसत आहे. बीड जिल्ह्यातील बहुतांश जिल्हा परिषद शाळांमध्ये मागील दोन वर्षांपासून महावितरणचे विजबील थकल्याने शाळेचा विजपुरवठा खंडीत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शाळांमधील संगणक, ई-लर्निंग सुविधेसह वीज उपकरणे बंद असल्याने विद्यार्थ्यांचे डिजिटल तसेच शैक्षणिक नुकसान होत आहे. संबंधित प्रकरणात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने विजबील भरून वीजपुरवठा सुरळीत करुन शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. पाटोदा तालुक्यातील ११२ जिल्हा परिषद शाळांमधील खंडित वीज पुरवठा खंडित आहे. त्यामुळे हा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे कार्यकर्त्यांसह गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे गेले असता ते हजर नसल्याने त्यांनी खुर्चीला हार घालून लक्ष वेधले.

Tags:    

Similar News