दोन कोटी वीजग्राहकांचा संताप: प्रताप होगाडे

कोरोनाच्या संकटकाळात वाढीव वीजबिलानं त्रस्त झालेल्या राज्यातील दोन कोटी वीजग्राहकांना आज उर्जामंत्र्यांनी अपेक्षाभंगाचा शॉक दिल्याची टीका उर्जातज्ञ प्रताप होगाडेंनी केली आहे.

Update: 2020-11-17 10:26 GMT

कोरोना महामारीमुळे राज्यात लॉकडाऊन असल्याने सर्वसामान्यांच्या हाताला काम नाही. मात्र घरगुती वीज वापर सुरूच असून त्याची वीजबिले महावितरणकडून प्रत्येक महिन्याला पाठवली जात आहेत. त्यामुळे ती भरायची कशी असा प्रश्‍न सर्वसामान्यांपुढे उभा राहत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महिन्याला ३०० युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या घरगुुती ग्राहकांना लॉकडाऊन काळातील सहा महिन्यांची बिले माफ करावीत या मागणीसाठी आम्ही गेली सहा महीने आंदोलनं केली आहेत असं संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे म्हणाले.

ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी ग्राहकांना २०-२५ टक्के सवलत देण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र आजच्या त्यांच्या वक्तव्यानं ग्राहकांमध्ये मोठी नाराजी असल्याचे होगाडे यांनी सांगितले.

केरळ, गुजरात आणि मध्यप्रदेशात ५० टक्क्याची सवलत वीजग्राहकांना दिली आहे. हे करण्यासाठी राज्याला केवळ ४५०० कोटीची तरदूत करावी लागणार आहे. येवढं देण्याची तयारी नसेल तर हे सरकार संवेदनाहीन सरकार आहे असं म्हणावं लागेल. उद्योग, घरघुती ग्राहकांना दिलासा देण्याची गरज होती. सरकारने आजअखेर कोरोनाचे पॅकेज जाहीर केलं नाही.

हे सरकार गरीबांसाठी नसेल तर निश्चितमधे सरकारमधे अंर्तविरोध असेल. केंद्राकडे पॅकेजची मागणी करणे देखील अयोग्य असल्याचं होगाडे म्हणाले.

Tags:    

Similar News