निवडणूक आयोगाकडून इलेक्टोरल बाँडची महिती जारी; जाणून कोणत्या पक्षाला किती रक्कम मिळाली?

केंद्रिय निवडणूक आयोगाकडून इलेक्टोरल बाँडची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भाजप प्रथम क्रमांकावर,तृणमूल काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर असून काँग्रेस तिसऱ्या स्थानी आहे.;

Update: 2024-03-17 14:26 GMT

Electoral Bonds| भारतीय स्टेट बँकेने निवडणूक आयोगाला इलेक्टोरल बाँडचा डेटा सुपूर्द केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission of India) निवडणूक रोख्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार निवडणूक रोखे (Electoral Bonds) वटवत भाजपने (BJP) तब्बल 6 हजार 986 कोटींची कमाई केली आहे. 2019 - 2020 या काळात 2555 कोटी रुपयांची कमाई भाजपने केले आहे, अशी माहिती या तपशीलातून समोर येत आहे.

कोणत्या कंपनीने किती निधी दिला या निवडणूक रोख्यांच्या निधीबाबत गुरूवारी जाहीर करण्यात आलं होते. मात्र त्यात कोणत्या कंपनीने आणि कोणत्या राजकीय पक्षाने किती निधी दिला हे मात्र जाहीर करण्यात आले नव्हते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) निवडणूक आयोगाला विचारल्यानंतर निवडणूक आयोगाने एसबीआयकडे (SBI) बोट दाखवले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला फटकारले होते. आता निवडणूक आयोगाकडून कुठल्या पक्षाने किती निवडणूक रोखे वटवले याबाबत माहिती सार्वजनिकरीत्या जारी करण्यात आली आहे. त्यानुसार रोखे वटवत कमाई करणाऱ्या पक्षामध्ये भाजपने एकुण 6 हजार 986 कोटींची कमाई केली आहे. यामध्ये तृणमूल काँग्रेस दुसऱ्या स्थानी तर काँग्रेस हा तिसऱ्या क्रमांकावर असून 1334.35 कोटींची कमाई केली आहे. तामिळनाडू राज्याचा सत्ताधारी पक्ष डीएमकेला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून 656.5 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या असून यामध्ये लॉटरी किंग सँटियागो मार्टिनच्या फ्युचर गेमिंगच्या 509 कोटी रुपयांचाही समावेश आहे.

काँग्रेसने किती कोटी रुपयांचे निवडणूक रोखे रोखले?

देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने 1,334.35 कोटी रुपयांचे निवडणूक रोखे रोखून धरले आहेत. याशिवाय, ओडिशाच्या सत्ताधारी बिजू जनता दलाला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून 944.5 कोटी रुपये मिळाले आहेत. तर आंध्रप्रदेशमधल्या सत्ताधारी पक्ष असलेल्या टीडीपीला 181.35 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे.

निवडणूक रोख्यांसंदर्भात पक्षांची क्रमवार माहिती

  • भाजपा : 6 हजार 986.5 कोटी
  • तृणमूल काँग्रेस : 1387 कोटी
  • काँग्रेस : 1334.35 कोटी
  • डीएमके : 656.5 कोटी
  • बिजू जनता दल : 944.5 कोटी
  • वायएसआर काँग्रेस : 442.2 कोटी
  • तेलगू देसम : 181.35 कोटी
  • बीआरएस : 1322 कोटी
  • सपा : 14.05 कोटी
  • अकाली दल : 7.26 कोटी
  • AIADMK : 6.05
  • नॅशनल कॉन्फरन्स : 50 लाख
  • भाजपा : 6 हजार 986.5 कोटी
  • तृणमूल काँग्रेस : 1387 कोटी
  • काँग्रेस : 1334.35 कोटी
  • डीएमके : 656.5 कोटी
  • बिजू जनता दल : 944.5 कोटी
  • वायएसआर काँग्रेस : 442.2 कोटी
  • तेलगू देसम : 181.35 कोटी
  • बीआरएस : 1322 कोटी
  • सपा : 14.05 कोटी
  • अकाली दल : 7.26 कोटी
  • AIADMK : 6.05
  • नॅशनल कॉन्फरन्स : 50 लाख
Tags:    

Similar News