कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणुकांचं युध्द लढणार - अजित पवार

Elections war will be fought on the strength of party activists - Ajit Pawar

Update: 2024-01-08 10:35 GMT

कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो आणि या कार्यकर्त्यांच्या बळावर आगामी निवडणुकांचें युध्द आपल्याला जिंकायचे आहे. असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजितदादा गट) राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी षण्मुखानंद सभागृहात झालेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात व्यक्त केला.

जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडली पाहिजे

धारावीतील टेंडरमुळे एका उद्योगपतीला फायदा होणार आहे अशी बोंब मारली जात आहे. त्याच्या खोलात जाऊन माहिती घेऊ. जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडली पाहिजे. प्रश्न सोडविण्याची ताकद आणि धमक आपल्यात आहे. काहीजण आज करतो उद्या करतो सांगत असतात मात्र आपले काम तसे नाही लगेच निर्णय असे आपले काम आहे .महायुतीच्या माध्यमातून सरकार राज्यात काम करत आहेत. मुंबईत विधानसभा, लोकसभा आणि महानगरपालिकेत योग्य ती आणि म्हणावी अशी संख्या गाठू शकलो नाही. आपल्या वॉर्डात निवडणूक लढणार्‍या व्यक्तीच्या पाठीशी ताकद उभी करायला हवी असेही मत अजितदादा पवार यांनी मांडले.

मुंबापुरीला एक रुपयाचा निधी कमी पडू देणार नाही

मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता सन्मान मेळावा संपन्न झाला यावेळी अजितदादा बोलत होते.यावेळी ते म्हणाले की, आता आपल्याला वेळ कमी आहे. सुरुवात चांगली झाली आहे त्यामध्ये सातत्य ठेवा. काम करताना खटका उडत असतो मात्र तो समजून घेऊन काम करा.आठवडयातील एक दिवस राष्ट्रवादीचे मंत्री आणि आमदार मुंबईसाठी वेळ देतील. कार्यकर्ते कामाला लागले की काय होते हे आज दिसले. शिवसेना च्या पक्ष वाढीवर कार्यकर्त्यांच लक्ष वेधून घेताना ते म्हणाले, शिवसेना फक्त मुंबईत होती त्यानंतर ती कोकणात पोचली. आपल्यातही ती जिद्द आहे आपणही तसे काम सुरू करु. सकाळी मुंबईतील वेगवेगळ्या भागात जाऊन लोकहिताच्या कामांची पाहणी आपण करू शकतो. याबरोबरच मुंबापुरीला एक रुपयाचा निधी कमी पडू देणार नाही असा शब्दही अजितदादा पवार यांनी दिला. मुंबईमध्ये पक्ष ज्यापध्दतीने वाढायला हवा होता. तसा वाढला नाही, आमचं लक्ष फक्त ग्रामीण भागाकडे राहिले. आता समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत जे काम सुरू आहे त्यातून आपल्याला नक्कीच बळ मिळेल असा विश्वास अजितदादा पवार यांनी मुंबईत व्यक्त केला.

सोबतच समीर भुजबळ यांच्या पाठीशी उभे राहून एकदिलाने काम केले तर पक्षाची ताकद मुंबईत उभी राहिल अशी महत्वाकांक्षा अजित पवरणी व्यक्त केली. एक एक पायरी म्हणजे कार्यकर्ता असतो. तो नेत्याला जोडणारा दुवा असतो. सर्व जाती धर्माच्या लोकांचा आपण आदर करतो. सर्व सणांमध्ये सहभागी होतो. हे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने पुढे आले पाहिजे. सत्तेकरता आम्ही सत्तेत गेलो नाही. सर्व सामान्य लोकांची कामे व्हायला हवी त्याकरता आम्ही सत्तेत गेलो. विरोधाला विरोध करायचा, मोर्चे काढायचे, यातून प्रश्न सुटणार आहे का? असा टोलाही अजित पवारांनी विरोधकांना लवला .

Similar News