‘नाथाभाऊ चोर, उचक्का, बदमाश हो गया’

Update: 2019-10-01 09:24 GMT

भाजपने आज पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं नाव नसल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. पक्षानं उमेदवारी जाहीर केली नसली तरी खडसे यांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी झालेल्या सभेत त्यांनी जोरदार फटकेबाजी केली.

मी पक्षाची ४० वर्ष सेवा केली, अनेकांना मोठं केलं. संघटन वाढवलं पण कधीच गैरव्यवहार केला नाही. मग नाथाभाऊ चोर, उचक्का, बदमाश हो कैसे हो गया? तिकीट आज ना उद्या मिळेल पण माझा एकच सवाल आहे माझा गुन्हा काय? असं म्हणत त्यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. मंत्रीपद माझा हक्क होता. माझ्या हातून काही चुकीचं घडलं असतं तर मी मान्य केलं असतं पण काहीच कारण नसताना मला ३ वर्ष मंत्रीपदापासून दूर ठेवलं गेलं असं खडसे म्हणाले.

माझा गुन्हा सिद्ध करुन दाखवावा मी राजकारणातून संन्यास घेईन असं आव्हान खडसेंनी दिलं. जळगावचा आशिर्वाद नाथाभाऊंसोबत असणारंय असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/554517848651124/?t=0

 

 

 

 

 

 

Similar News