कथित बारामती अ‍ॅग्रोे गैरव्यवहार प्रकरणी रोहित पवारांची आज ईडी चौकशी

कथित बारामती अ‍ॅग्रोे गैरव्यवहार प्रकरणी आज राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांची आज ईडी चौकशी होणार आहे. दरम्यान इडी कार्यालयाबाहेर शरद पवार गट शक्तिप्रदर्शन करणार आहे, तर चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याची रोहित पवारांची प्रतिक्रिया

Update: 2024-01-24 03:24 GMT

Mumbai : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांची आज इडी (ED) चौकशी होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) रोहित पवार यांच्या समर्थनात पक्ष शक्तिप्रदर्शन करणार आहे. आमदार रोहित पवारांची चौकशी संपेपर्यंत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे देखील दिवसभर पक्षाच्या कार्यालयातच थांबणार आहेत. तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) रोहित पवार यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडायला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. इडी चौकशीदरम्यान पूर्ण सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.

काही दिवसांपासून रोहित पवारांच्या घरी ईडीची छापेमारी सुरू होती. पण त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं नव्हतं. मात्र, त्यांना आज इडी कार्यालयात चौकशीसाठी हजर रहायला सांगितले आहे. या पार्श्वभूमिवर रोहित पवार म्हणाले की " मी ज्याप्रकारे वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य करतोय, त्यामुळे माझ्यावर केंद्रीय यंत्रणांचा दबाब आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं" रोहित पवारांकडून वारंवार सांगितलं जात होतं. "इडी चौकशीदरम्यान पूर्ण सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे. त्याशिवाय कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्लाही रोहित पवार यांनी दिला आहे.

Tags:    

Similar News