यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने मारली बाजी

Update: 2020-02-04 06:05 GMT

महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनेने दुष्यंत चतुर्वेदी यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर भाजपकडून सुमित बाजोरिया यांना उमेदवारी दिली होती. क्रमदेय पद्धतीने झालेल्या या मतदानात दुष्यंत चतुर्वेदी यांना पल्या पसंतीची 298 मते मिळाली.

तर भाजप उमेदवार सुमित बाजोरिया यांना 185 मतं मिळाली. 31 जानेवारीला यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पार पडली होती. जिल्हा परिषदेचे सदस्य, नगरपरिषदा, नगर पंचायतींचे सदस्य आणि 16 पंचायत समित्यांचे सभापती मिळून 489 मतदार असलेल्या मतदार संघात 100 टक्के मतदान पार पडले होते.

यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेतील पक्षीय बलाबल

• भाजप – 147

• शिवसेना – 97

• काँग्रेस – 92

• राष्ट्रवादी काँग्रेस- 51

• प्रहार – 18

• इतर – 72

• बसपा – 4

• एमआयएम – 8

• एकूण – 489

यवतमाळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेतून शिवसेनेचे तानाजी सावंत हे विधानपरिषदेचे सदस्य होते. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीत उस्मानाबाद मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेल्यानं ही जागा रिक्त झाली होती. त्यानंतर शिवसेनेने कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री सतीष चतुर्वेदी यांचे चिरंजीव दुष्यंत चतुर्वेदी यांना शिवसेनेत प्रवेश देत उमेदवारी दिली होती. सतीष चतुर्वेदी हे हे विदर्भाच्या राजकारणातील मोठं नाव आहे. ते 25 वर्ष आमदार आणि 10 वर्ष कॅबिनेट मंत्री होते.

Similar News