भारत-चीन सीमावादात डोनाल्ड ट्रम्प यांची ऑफर

Update: 2020-05-28 01:36 GMT

भारत आणि चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सीमावादात आता अमेरिकेने मध्यस्थाची भूमिका निभावण्याची तयारी दाखवली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्विट करुन, “ भारत आणि चीन दरम्यान गंभीर होत चाललेल्या सीमावादाच्या मुद्द्यावर अमेरिका मध्यस्थ म्हणून करण्यास तयार आहे, तंसच या वादावर तोडगा काढण्य़ासही तयार आहे, दोन्ही देशांना तसे कळवले आहे” अशी माहिती दिली आहे.

लडाखमध्ये भारताने सीमेवर आपल्या हद्दीत रस्ते बांधणीचे काम सुरू केले आहे. पण त्याला चीनने आक्षेप घेत हे काम बंद करण्याची मागणी केली आहे. पण कोणत्याही परिस्थितीत हे काम बंद करणार नाही अशी भूमिका भारताने घेतली आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा वाद मिटवण्यासाठी ट्रम्प यांनी वारंवार मध्यस्थाची भूमिका निभावण्याची तयारी दाखवली आहे. पण आता त्यांनी भारत आणि चीनदरम्यानही मध्यस्थाची भूमिका करण्याची तयारी दाखवली आहे.

दरम्यान लष्करप्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी चीनच्या सीमेवरील घडामोडींची माहिती दिली. तसंच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अजित डोवाल यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी या मुद्द्यावर चर्चा केली आहे. दरम्यान चीनने आपले 5 हजार सैनिक या भागात सीमेवर तैनात केले आहेत.

Similar News