जामिया मिलिया विद्यापीठातील हिंसाचार, दिल्ली हायकोर्टाचे महत्त्वाचे आदेश

Update: 2020-07-07 01:52 GMT

दिल्लीतील जामिया मिलिया विद्यापीठात CAA विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीमार करण्यात आला होता.

दिल्ली पोलिसांनी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या आदेशानुसार हा लाठीमार केला असा आरोप करणारी याचिका दिल्ली कोर्टात दाखल करण्यात आली आहेत. तसेच या आरोपांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणीही या याचिकांमध्ये करण्यात आली आहे.

या पार्श्‍वभूमीवर झालेल्या सुनावणीत सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी गृहमंत्र्यांविरोधात कोणताही पुरावा नसताना अशाप्रकारे याचिकांमध्ये आरोप करणे चुकीचे आहे आणि गेल्या काही दिवसांमध्ये असे आरोप करण्याची पद्धत सुरू झालेली आहे, असा आक्षेप नोंदवला.

हे ही वाचा..

घटनात्मक पदांवर बसलेल्या व्यक्तींबाबत असे आरोप करण्याची पद्धत चुकीची आहे अशी भूमिका मेहता यांनी मांडली. तसेच जाहीर भाषणांमध्ये आरोप करणं वेगळं पण कोर्टातील कागदपत्रांमध्ये पुरावा नसताना आरोप करणं चुकीचं आहे अशी भूमिका मांडत कोर्टाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणीदेखील केली.

या पार्श्वभूमीवर कोर्टाने याचिकाकर्त्यांना याचिकेतील पुरावे नसलेले आरोप काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 13 जुलै रोजी होणार आहे.

Similar News