इंदू मिल स्मारकः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी धनंजय मुंडे, वर्षा गायकवाड दिल्ली दौऱ्यावर

इंदू मिल स्मारकः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी धनंजय मुंडे, वर्षा गायकवाड दिल्ली दौऱ्यावर काय सर्व प्रकरण नक्की वाचा

Update: 2022-05-18 11:57 GMT

Indu Mill 

इंदू मिल स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उद्या दिल्ली दौऱ्यावर येणार आहेत. इंदू मिल स्मारकमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं काम उत्तर प्रदेशमधील गाजियाबाद येथे सुरू आहे. या पुतळ्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी स्वतः मंत्री धनंजय मुंडे आणि वर्षा गायकवाड दिल्ली दौऱ्यावर येणार आहेत.

उद्या १९ मेला सकाळी ८ वाजता दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून गाजियाबाद कडे दोनही मंत्री रवाना होणार आहेत. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल मध्ये उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याचं काम सुरू आहे. या पुतळ्याचे काम कसे सुरू आहे. याची दोनही मंत्री प्रत्यक्षरित्या पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी सूचना देणार आहेत.

इंदू मिल स्मारक समितीमध्ये शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि एकनाथ शिंदे यांचा समावेश आहे. पैकी वर्षा गायकवाड, धनंजय मुंडे प्रत्यक्षात येऊन पुतळ्याची पाहणी करणार आहेत.

Tags:    

Similar News