देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं अभिनंदन करतात...!

Update: 2020-02-23 10:57 GMT

सोमवारपासून विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. त्या संदर्भात आज विरोधी पक्षाची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन बाबींवरुन यांचे कौतुक केले.

मुख्यमंत्र्यांनी एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे सोपविला आहे आणि दुसरं म्हणजे त्यांनी सीएएला पाठिंबा दिल्याचे जाहीर केले आहे. 'याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन’, अशा शब्दात फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं. मात्र, सध्याच्या सरकारला दिशा सापडली नाही, ते अद्यापही गोंधळलेले आहेत. सरकार स्थापन झाल्यापासून त्यांना सूर गवसलेला नाही, असं म्हणत सरकार वर हल्लाबोल देखील केला.

काय म्हटलंय देवेंद्र फडणवीस यांनी...

“सरकारची दिशा ठरत नाही, आणि सूरही गवसत नाही”

-आधी स्वतः आपसात सुसंवाद करावा,

-नंतर विरोधी पक्षांशी संवाद साधावा

-अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना काहीही मदत मिळालेली नाही.*

-ज्या आमच्या कर्जमाफीला नावे ठेवली, तीच पद्धत यांनी आत्मसात केली. शेतकऱ्यांची मोठी फसवणूक:

-केवळ पीककर्ज यांनी समाविष्ट केले.

-त्यामुळे शेडनेट, पशुपालन असे सर्व प्रकारचे कर्ज या नव्या कर्जमाफीत समाविष्ट नाही, जे आमच्या काळात समाविष्ट होते

-महिला अत्याचार तर पराकोटीला गेला आहे.

-पोलिस दलाचे खच्चीकरण केल्यामुळे त्यांचे मनोबल घटले आहे आणि त्यामुळे गुन्हेगारीत प्रचंड वाढ झाली आहे. त्याविरोधात आम्ही आवाज उठवू

-सर्व चांगल्या कामांना स्थगिती देण्याचा प्रकार वाढला आहे.

-जलयुक्त शिवार सरकार बंद जरूर करेल, पण जनता ती बंद होऊ देणार नाही

-दोन बाबींसाठी मला मुख्यमंत्री उद्धवजी यांचे अभिनंदन करायचे आहे. एनआयएकडे तपास आणि सीएए या दोन्ही बाबतीत त्यांनी परखड भूमिका घेतली

-स्वातंत्र्यवीर सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. 'शिदोरी' मासिकावर कारवाई करावीच लागेल. इंदिराजींबाबत 10 मिनिटात माफी मागणारे सावरकरांबाबत मौन का?

-जनगणनेचा कायदा कठोर आहे.

-प्रश्नावली ठरविण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आहे

-भीमा कोरेगाव आणि एल्गार हे वेगळे नाही, हेच आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे.

-तपासाची व्याप्ती आता वाढली असल्याने तो केंद्र सरकारकडे जाणेच योग्य

-जलयुक्त शिवार असो की वृक्षारोपण आम्ही कोणत्याही प्रकारच्या चौकशीला घाबरत नाही.

-जाणीवपूर्वक लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न.

-सुधीर मुनगंटीवार यांनी अतिशय उत्तम काम केले, मी त्यांचे अभिनंदन

-1999 पासून ते 2019 पर्यंतच्या आर्थिक स्थितीवर सर्व निकष दाखवीत श्वेतपत्रिका नक्की काढली पाहिजे.

-खरे चित्र जनतेपुढे येईल

-राम मंदिरासाठी ट्रस्ट तयार करावा, हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

-मुस्लिम समाजाचे सर्व स्थळ हे वक्फ बोर्डाच्या अंतर्गत येतात, हेही त्यांना ठावूक आहे. तेथे ट्रस्ट नसतो

-सद्या मुस्लिम मतांसाठी देशात स्पर्धा सुरू आहे

-थेट निवडणूक असली की सरकारचा हस्तक्षेप कमी असतो. त्यामुळेच त्या रद्द करण्याचा सपाटा लावला आहे. सरपंच निवडणूक थेट घेण्याचा निर्णय आम्ही सुद्धा सरपंच परिषदेच्या शिफारसीवर घेतला होता

Similar News