कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास ‘एनआयए’ कडे !

Update: 2020-01-25 06:26 GMT

भीमा कोरेगाव (bhima koregaon) हिंसाचार हे तत्कालीन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारचं षडयंत्र आहे. या प्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे (Uddhav Thackeray ) मागणी केली होती. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)यांनी या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतर लगेच एल्गार परिषद प्रकरणाचा तपास ‘एनआयए’कडे देण्यात आला आहे.

या संदर्भात प्रतिक्रिया देताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्र सरकारच्या या कृतीचा निषेध केला आहे.

महाराष्ट्रराज्य सरकारने कोरेगाव-भीमा घटनेच्या मुळाशी जाण्याचे ठरविल्यानंतर केंद्र शासनाने हस्तक्षेप करून राज्य शासनाची कोणतीही परवानगी न घेता हा तपास NIA कडे दिला हे घटनेच्या विरोधात आहे केंद्राच्या या निर्णयाचा मी निषेध करतो. असं देशमुख यांनी म्हटलं आहे.

तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या या कृतीचं समर्थन केलं असून एल्गार परिषदेचं जाळं देशभर पसरलं आहे. त्यामुळे तपास ‘एनआयए’कडे वर्ग करण्याचा निर्णय योग्यच असल्याचा दावा फडणवीसांनी केला आहे.

Similar News