उपमुख्यमंत्री अजित पवार पश्चिम महाराष्ट्रात दौऱ्यावर

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सांगली जिल्ह्यातील भिलवडी येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करत पूरग्रस्तांच्या मागण्या आणि गाऱ्हाणी ऐकून घेतल्या.

Update: 2021-07-26 07:55 GMT

सांगली : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सांगली जिल्ह्यातील भिलवडी येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करत पूरग्रस्तांच्या मागण्या आणि गाऱ्हाणी ऐकून घेतल्या. सोबतच पुरग्रस्तांसाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या निवारा छावणीला देखील त्यांनी भेट दिली तिथल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. अजित पवार कोल्हापूर, सातारा आणि सांगली अशा तिन्ही जिल्ह्यांना भेट देणार होते. मात्र खराब हवामानामुळे त्यांचा कोल्हापूर दौरा रद्द करण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम हे देखील उपस्थित आहेत. दरम्यान

पुरग्रस्तांच्या राहण्याची, खाण्यापिण्याची काय सोय आहे? याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी माहिती घेतली. तिथल्या नागरिकांशी त्यांनी आस्तेवाईकपणे विचारपुस केली.

भिलवडी परिसरातील ज्या भागाला वारंवार पुराचा फटका बसतो अशा घरांचे सर्व्हेक्षण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. सोबतच अशा घरांचे उंच जागेवर पुनर्वसन करण्यासाठी जागेची उपलब्धता होऊ शकते का? याबाबत प्रशासनाने तपासणी करावी अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या.

पुरग्रस्तांच्या पुनर्वसन आणि मदतीसाठी तातडीने मार्ग काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. संकटाच्या काळात राज्य सरकार प्रत्येक नागरीकाच्या पाठीशी ठामपणे उभे आहे असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

Tags:    

Similar News