CAA, NPR वरुन राज्य सरकारमधले मतभेद कायम

Update: 2020-02-27 11:50 GMT

CAA आणि NPR ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसनं पुन्हा एकदा या दोन्ही मुद्द्यांवर वेगळी भूमिका घेतल्याने सरकारमध्येच यावर मतभेद असल्याचे उघड झाले आहे. “CAAची अंमलबजावणी राज्य सरकारच्या अखत्यारीत नाही. सर्व अधिकार केंद्राकडे आहेत.

आमच्या अखत्यारित नसताना CAA का राबवावा,” असा सवाल अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे. तसंच राज्यात एनआरसी लागू होवू देणार अशी भूमिकाही त्यांनी घेतली आहे. एनआरसी आणणार नाही असे सांगून आपली भूमिका भाजपने बदलली असली राज्य सरकारने आणि राष्ट्रवादीनं आपील भूमिका स्पष्ट केली आहे, असंही मलिक यांनी म्हटलंय.

२०१० मध्ये एनपीआरची प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यावेळी प्रश्नावली तयार झाली होती. मात्र जे प्रश्न आता त्यात टाकण्यात आले आहेत ते आम्हाला मान्य नाही, त्यामुळे तिन्ही पक्षांचे लोक याबाबत एकत्र बसून चर्चा करतील असंही नबाव मलिक यांनी म्हंटलं आहे. अमित शहांना अपेक्षित आहे ते आम्ही लागू करु देणार नाही असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे.

Similar News