दिल्ली हिंसाचारात गोळीबार करणारा शाहरूख पोलिसांच्या ताब्यात

Update: 2020-02-25 05:16 GMT

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताच्या दौऱ्यावर असताना राजधानी दिल्लीमध्ये सीएए आणि एनआरसी विरोधातील आंदोलनाने हिंसक रूप घेतले आहे. उत्तर दिल्ली भागात भागात काल दिवसभर दगडफेक आणि गोळीबाराच्या घटना घडल्या. या आंदोलनात आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी आहेत.

या हिंसाचाराचे फोटो समोर आल्यानंतर लाल टी-शर्टमध्ये शाहरूख नावाचा व्यक्ती गोळीबार करत असल्याचं समोर आलं होतं. एएनआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलंय.

रात्री उशीरा दिल्लीतल्या गोकुळपुरी भागात टायर मार्केटला आग लागल्याची घटना घडली होती. परिणामी संपूर्ण दिल्लीभर धूर पसरला आहे. दिल्लीच्या यमुना पार भागात कलम १४४ लागू करण्यात आलंय.

 

Similar News