VIDEO : दिल्लीत पोलिस आणि वकील यांच्यात हाणामारी

Update: 2019-11-03 12:06 GMT

दिल्ली च्या (Delhi) तीस हजार न्यायालयाच्या परिसरात वकील आणि पोलिस कर्मचाऱ्या दरम्यान झालेल्या वादाची दखल दिल्ली उच्च न्यायालयाने घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने केंद्र सरकार, दिल्ली सरकार, बार काउंसिल ऑफ इंडिया, बार काउंसिल ऑफ दिल्ली, सर्व जिल्ह्यांचे बार काउंसिल आणि दिल्ली उच्च न्यायालयाचे बार काउंसिल या सर्वांना नोटिस दिली आहे.

न्यायालयाने यावेळी ‘आम्ही कालही 4 तास बसलो होतो आजही चार तास बसलो. आम्ही या संदर्भात परस्पर सहमतीने हे प्रकरण मिटावं यासाठी प्रयत्न करत आहोत’. असं न्यायालयानं म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

एक दिवसांपुर्वी दिल्ली च्या तीस हजारी न्यायालयाच्या परिसरात वकील आणि पोलिस कर्मचाऱ्यामध्ये गाडी पार्क करण्यावरुन वाद झाला होता. हा वाद शनिवारी साधारण 2:30 वाजता झाला. त्यानंतर वकील आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी एकमेकांना मारहाण केली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील झाला आहे. या मारहाणीत पोलिस तसंच वकील गंभीर जखमी झाले. या वादात काही गाड्यांची जाळपोळ देकील करण्यात आली आहे. आता या सर्व प्रकरणानंतर दोनही पक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करायला सुरुवात केली आहे.

Similar News