एक्झिट पोल – दिल्लीत पुन्हा केजरीवाल

Update: 2020-02-08 14:57 GMT

दिल्लीमध्ये पुन्हा एकदा केजरीवाल सरकार येण्याचा अंदाज सर्वच एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आला आहे. आज दिल्ली विधानसभा निवडणुकीत ७० जागांसाठी मतदान पार पडलं असून ५२% मतदान झालं आहे. मतदान झाल्यानंतर एक्झिट पोलच्या अंदाजानुसार केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला ४९ ते ६३ पर्यंत जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर भाजपला सत्ता मिळणार नसली तरी गेल्या वेळच्या तुलनेत भाजपच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. पण काँग्रेसचे बुरे दिन याही निवडणुकीत कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

लोकसभा निवडणुकीतील सर्वच एक्झिट पोलचे चुकलेले अंदाज पाहता यावेळी सर्वच वृत्तवाहिन्यांनी सरसकट जागा न देता ४९ ते ६३, ५ ते १९ असाच अंदाज वर्तवला आहे.

 

Similar News