छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमान प्रकरणी शिवप्रेमी आक्रमक; बेळगावात दगडफेक

बंगळूर शहरातील सदाशिवनगर (Bangalur) भागात काही समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याने कर्नाटकात शिवप्रेमी संतप्त झाले आहेत

Update: 2021-12-18 03:19 GMT

बेळगाव// बंगळूर शहरातील सदाशिवनगर (Bangalur) भागात काही समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याने कर्नाटकात शिवप्रेमी संतप्त झाले आहेत. या प्रकरणी महाराष्ट्र एकीकरण समितीने अशा समाजकंटकांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर संभाजी सर्कल येथे समाजकंटकांचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी रात्री मोर्चा काढण्यात आला होता.

यावेळी संभाजी सर्कल येथे जमून शिवप्रेमींनी सर्व रस्ते बंद केले होते. तर या घटनेच्या विरोधात दगडफेकीच्या घटना घडल्या. संभाजी सर्कल येथे शिवप्रेमींनी पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

पाच दिवसांपुर्वी महाराष्ट्रात लाल पिवळ्याची होळी केल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याविरोधात देशभर संतापाची लाट उसळली आहे.

मनगुत्ती येथे उभारण्यात आलेला पुतळाही रात्रीच्या अंधारात हटवण्यात आला होता. तेव्हापासून वेळोवेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचा प्रकार काही संघटना आणि समाजकंटकांकडून सुरू आहे. त्यामुळे समाजात तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींना वेळीच धडा शिकवण्यासाठी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Tags:    

Similar News