‘जात’ जात नाही, दोन पत्रकारांमध्ये जुंपली !

Update: 2020-05-09 11:22 GMT

प्रिय मित्र Prasad Kathe जी,

भाजपच्या उमेदवाराच्या गळ्यात स्टेथोस्कोप असलेल्या फोटो वरून मुंबईतील दोन ज्येष्ठ पत्रकारांमध्ये चांगलीच जुंपली आहे. एका वृत्तवाहिनीचा संपादक असलेल्या पत्रकाराने छोट्या जातीचा उल्लेख केल्याने त्यांच्यावर टीका होऊ लागलीय. या प्रकरणातील ज्येष्ठ पत्रकार कमलेश सुतार यांची पोस्ट जशीच्या तशी....

काल माझ्या वॉलवर भाजपच्या उमेदवाराने गळ्यात स्टेथसस्कोप घालून अर्ज भरल्याचे फोटोज टाकले होते. आपण माझ्या वॉल वर येऊन आपल्या थोर विचारांची पिंक त्यावर टाकलीत. कमेंट सेक्शन मध्येच उत्तर देणार होतो, पण आपल्या विचारांचं दर्शन पुन्हा एकदा जगाला व्हावं म्हणून कमेंटीचा स्क्रीनशॉट टाकतोय.

तर माननीय Kathe जी, सर्वप्रथम हा मुद्दा एका व्यक्ती बाबत होता. माझ्यासाठी तो पक्षाचा उमेदवार होता, शिवाय 'डॉक्टर' देखील...पण आपण अपेक्षेप्रमाणे त्याला जातीवर आणुन ठेवले. बरं फक्त त्याची जात काढूनच आपण थांबला नाहीत तर त्याची जात 'छोटी' आहे हे ही ठरवून मोकळे झालात !

'छोट्या जातीचा' हे ठरवणारे तुम्ही कोण ? एक लक्षात असुद्या , तुमचा तो अधिकार संविधान देणाऱ्या आमच्या बापानं कधीच काढून घेतलाय !!!

Similar News