Mumbai: दादर चौपाटीवरून जमा केला लाखो टन कचरा

Update: 2019-10-28 11:14 GMT

मुंबई त समुद्रकिनारे प्रदूषित झाले असून काही स्वच्छता दूत समुद्रकीनाऱ्यावर दर शनिवार आणि रविवारी स्वच्छता मोहीम राबवतात. दादर चौपाटीवर गेल्या पावणेतीन वर्षांपासून स्वच्छता मोहीम राबविली जात असून आतापर्यंत लाखो टन कचरा जमा करण्यात आला आहे. या सर्व स्वच्छता मोहिमेचं आयोजन जय शृंगारपुरे करत आहेत तरीही समुद्रकिनाऱ्यांवरचा कचरा कमी होत नसल्याची खंत त्यांनी मॅक्स महाराष्ट्राशी बोलताना व्यक्त केली आहे.

घरातील सुका कचरा आणि ओला कचरा याचं विभाजन करुन विल्हेवाट लावण्याचा सल्ला जय शृंगारपुरे यांनी मुंबईकरांना दिला आहे. दादर चौपाटीवर स्वच्छता मोहिमेत वेगवेगळ्या संस्था, संघटना, महाविद्यालय विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं मत जय शृंगारपुरे यांनी व्यक्त केलं आहे. ह्या स्वच्छता मोहिमेला सुरवात कशी झाली पहा हा व्हिडिओ...<

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/2187907858169706/?t=10

Similar News