चेंबूर मधील सिद्धार्थ कॉलनीत सिलेंडरचा स्फोट; चार जण गंभीर जखमी

Update: 2024-02-02 04:28 GMT

Chembur : चेंबूर मधील सिद्धार्थ कॉलनी येथे काल रात्री 11:15 वाजता सिलेंडर गॅसचा विस्फोट झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सिलेंडरचा अचानक स्फोट झाल्यामुळे त्याच्या आवाजाचा हादरा आजूबाजूच्या परिसरात पाचशे मीटर पर्यंत जाऊन वस्तीतल्या लोकांना खूप मोठा धक्का जाणवला.स्फोटाचा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. या सिलेंडरच्या स्फोटामध्ये तीन महिला व एक पुरुष यांचा समावेश असून ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना नजीकच्या राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन लागलेल्या आगीला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नात लागले. या घटनेने कॉलनीतील लोकांना खूप मोठा धक्का बसला असून परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Tags:    

Similar News