#Covid19 : जळगाव जिल्ह्यात निर्बंध लागू

Update: 2021-02-22 13:46 GMT

जळगाव – राज्यातील अनेक भागात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. पहिल्या टप्प्यात राज्याची चिंता वाढवणाऱ्या जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आता प्रशासनाने जळगाव जिल्ह्यात रात्री 10 ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. तसेच शाळा, महाविद्यालय आणि सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रसार पाहता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आजपासून रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत संचारबंदी जाहीर केली आहे. तर जिल्ह्यातील शाळा , कॉलेज , खाजगी क्लासेस , सार्वजनिक कार्यक्रम पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जळगाव जिल्ह्यात एक हजाराच्या वर कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण असून गेल्या 24 तासात 216 रुग्णांची नव्याने भर पडली आहे. लग्न समारंभात काटेकोर नियमाचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. दवाखाने, मेडिकल, दूध, किराणा या अत्यावश्यक सेवाच केवळ चालू राहणार आहेत.

Tags:    

Similar News