दिलासा : कोरोनाच्या रुग्णांची दुपटीने होणारी वाढ मंदावली

Update: 2020-04-21 03:20 GMT

देशात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत असला तरी एक दिलासादायक माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे. कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी साडे सात दिवसांवर पोहोचला आहे.

आधी साडे तीन दिवसात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दुप्पट होत होती. ती आता वाढून साडे सात दिवसांवर पोहोचली आहे. रविवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशातील १८ राज्यांमध्ये तर राष्ट्रीय सरासरीपेक्षाही दिलासादायक आकडेवारी आली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे.

देशातील सर्व राज्यांमधील मिळून ५९ जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ दिवसांत कोरोनाचे नवीन रुग्ण आढळलेले नाहीत. तर गोवा हे राज्य कोरोनामुक्त झाले आहे. दरम्यान कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या सोमवारी १७ हजारांच्यावर पोहोचली आहे, तर सुमारे २ हजार ८०० रुग्ण बरे झाल्याची माहितीही सरकारतर्फे देण्यात आली आहे.

Similar News