कोरोनाग्रस्त आशिष शेलार यांना रेमडीसीवर मिळत नाही: प्रसाद लाड

Update: 2021-04-16 16:53 GMT

रेमडेसिवीरचा राज्यात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. राज्य सरकारने रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण होऊ नये. म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना रेमडेसिवरचे सर्व अधिकार दिले आहेत. तरीही राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा आहे. यावरुन भाजप आमदार प्रसाद लाड यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.

 राज्यात आजही रेमडेसिवीरचा काळाबाजार होत आहे. त्यामुळे कोरोना झालेल्या आमदार आशिष शेलार यांना रेमडेसिवीर मिळत नसल्याचं दावा आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.


काय म्हटलंय प्रसाद लाड यांनी…


राज्यातील रेमडेसिवीरचा तुटवडा लक्षात घेता भाजप नेत्यांनी विविध औषध कंपन्यांकडे चाचपणी करून इंजेक्शन मिळवण्याच्या प्रयत्नाचा केला. त्यामघ्ये दमणला मधील एका कंपनीने भाजपच्या नेत्यांना ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, या कंपनीला राज्य सरकारने पत्र न दिल्यानं अद्यापर्यंत रेमडेसिवीर मिळाले नाहीत. असा दावा लाड यांनी केला आहे.

रेमडीसीवर इंजेक्शनचा काळा बाजार करू नये. अशी मागणी केली आहे. प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी एक पत्र सर्व आमदारांना पाठवलं होतं. ज्यामध्ये रेमडिसिवर इंजेक्शनचा साठा कोणत्या कोणत्या सेंटरवर (स्टॉक) उपलब्ध आहे. या बद्दल माहिती दिली होती. पण कोणत्याही सेंटर ला फोन केला असता, साठा नसल्याचं सांगितलं जातं.

आमचे नेते आशिष शेलार हे रुग्णालयात आहेत. त्यांना आम्हाला रेमडिसीवर इंजेक्शनची उपलब्धता करून द्यायची आहे. पण लिलावती रुग्णालयात देखील रेमडिसिवर इंजेक्शनची उपलब्धता नाहीये.

असं म्हणत आमदार आशिष शेलार यांना रेमडीसीवरची गरज असूनही रेमडीसीवर मिळत नसल्याचा गंभीर दावा केला आहे.

Tags:    

Similar News