कोरोनो व्हायरस : भारतासाठी संधी की संकट?

Update: 2020-03-16 16:52 GMT

कोरोनो व्हायरस चा फटका जगातील जवळ जवळ सर्व देशांना बसला आहे. मात्र, कोरोनो व्हायरसचा सर्वाधिक फटका चीन ला ( वुहान ) बसला आहे. कोरोनोमुळे चीन मध्ये 3 हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक अजुनही बिछान्यातच आहे. कोरोनाचा चीन च्या आर्थिक व्यवस्थेला देखील मोठा फटका बसला आहे. चीन मधील 50 % उद्योग कमी झाले आहेत. त्यामुळे चीनमध्ये कोळशाचा वापर 75% कमी झाला आहे. कोरोनो मुळे चीन चे प्रदुषण कमी झाल्याचं देखील समोर आलं आहे. कोरोनो ने चीनची निर्यात 20 % कमी झाली आहे.

चीन आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात कच्च्या मालाची निर्यात करतो. हा कच्चा माल पुरवला न गेल्यानं अमेरिका, युरोपातील देश ही बाजारपेठ म्हणून भारताकडे पाहात आहे. या सर्व आर्थिक बाबींचा विचार करता कोरोना व्हायरस च्या निमित्तानं भारताला जागतिक व्यापारात आपलं स्थान निर्माण करण्याची संधी निर्माण झाली आहे का? नक्की पाहा आंतरराष्ट्रीय घडामोडीचे विश्लेषक शैलेंद्र देवळाणकर यांचे विश्लेषण कोरोनो व्हायरस : भारतासाठी संधी की संकट

Full View

Similar News