कोरोना व्हायरस : अखेर सरकारनं ‘तो’ निर्णय घेतलाच

Update: 2020-03-22 00:32 GMT

करोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी अखेर सरकारनं सामान्यांच्या लोकल प्रवासावर निर्बंध लादले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी CSMT स्टेशनवर जाऊन पाहणी केल्यानंतर हा निर्णय़ घेण्यात आला आहे. निर्बंध लागू करण्यात आले आहेत. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शक्यतो घरुन काम करा असं आवाहन सरकारनं केलं होतं, पण मुंबईतील लोकलमधली गर्दी कमी होत नसल्यानं अखेर लोकल प्रवासावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

अत्यावश्यक सेवा किंवा तातडीची वैद्यकीय गरज असेल तरच लोकल प्रवास करु दिला जाणार आहे. २२ मार्च म्हणजेच आजपासून ते ३१ मार्चपर्यंत हे निर्बंध लागू असणार आहेत. त्यासाठी लोकल स्थानकांवर विशेष पथकं तैनात केली गेली आहेत. आयकार्ड पाहून लोकल स्थानकांवर प्रवेशासाठी परवानगी दिली जाणार, अन्यथा प्रवास करण्यास बंदी घातली जाणार आहे.

Courtesy : Social Media

रेल्वे स्थानकात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची पोलीस चौकशी करणार आहेत, तसंच अत्यावश्यक सेवेत कार्यरत आहे याची खात्री केली जाईल. वैद्यकीय सेवेच्या तात्काळ गरजेबाबतही प्रवास करणाऱ्या प्रवाशांची खात्री करुनच त्यांना प्रवासाची मुभा मिळणार आहे. ज्या व्यक्तींना लोकलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे त्यांची थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी होणार आहे. ज्या प्रवाशांना लांब पल्ल्याच्या रेल्वेने बाहेर गावी जायचे आहे त्यांच्या तिकिटाची तपासणी करुन त्यांना रेल्वे स्थानकावर प्रवेश देण्यात येणार आहे.

Similar News