कोरोनाच्या विषाणूचा हवेतूनही प्रसार शक्य? WHO ने दिली ही माहिती...

Update: 2020-07-10 02:48 GMT

कोरोनाचा विषाणू हा हवेतून पसरुन त्याचा संसर्ग वाढू शकतो असा दावा पुराव्यांसह करणारे पत्र 239 संशोधकांनी जागितक आरोग्य संघटनेला पाठवले आहे. यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

कोरोनाचा विषाणू हवेतून पसरणे शक्य आहे असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलेले आहे. पण या पुराव्यांचा अभ्यास करुन त्याचा प्रसार नेमका कसा होतो, हा प्रसार ऱोखण्यासाठी काय केले पाहिजे यावर तातडीन अभ्यासाची गरज असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण विभागाच्या तांत्रिक विभागाच्या प्रमुख बेनेडेट्टा एलेगांझी यांनी म्हटले आहे.

जागितक आरोग्य संघटनेच्या हेल्थ इमरजन्सी विभागाच्या प्रमुख मारिया वान करकोव्ह यांच्या मते कोरोना संसर्गाच्या मार्गांपैकी हवेतून त्याचा प्रसार होतो याबद्ल आणखी संशोधन होण्याची गरज आहे, असे म्हटले आहे. काही पुरावे समोर आले असले तरी त्यातून तातडीने निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे हवेतून संसर्ग होण्याची शक्यता ही गर्दीची ठिकाणी, बंदीस्त जागा किंवा जिथे खेळती हवा नाही अशा ठिकाणी जास्त आहे. पण त्यासाठी आणखी पुराव्यांची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे.

कोरोनाचा विषाणू हा बाधित व्यक्तीच्या नाकाद्वारे किंवा तोंडाद्वारे बाहेर पडू शकतो. हा विषाणू काही काळ हवेत राहतो. त्यामुळे एखादी व्यक्ती त्या व्यक्तीच्या जवळ असली तर त्याला संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून तोंडावर मास्क आणि 1 मीटर अंतर ठेवण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे.

Similar News