मोदी आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Update: 2021-06-08 13:25 GMT

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाची बैठक पंतप्रधानांसोबत झाली, ती बैठक वैयक्तिक नव्हती मुळात प्रशासकीय आणि शासकीय होती, त्यामुळे त्याला राजकीय अंगाने पाहू नये, असे पटोले यांनी म्हटले आहे. त्या बैठकीमध्ये मराठा आरक्षण आणि महाराष्ट्राचे एक लाख कोटींच्यावर पैसे केंद्र सरकारकडे बाकी आहे त्यावर चर्चा झाली, असेही पटोले यांनी म्हटले आहे.

Full View
Tags:    

Similar News