काँग्रेस संजय राऊत यांच्या पाठीशी, राहुल गांधी यांचे संजय राऊत यांना पत्र

गेल्या काही दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांची चौकशी सुरू आहे. त्यातच संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. त्यापार्श्वभुमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संजय राऊत यांना पत्र लिहून काँग्रेस संजय राऊत यांच्या पाठीसी असल्याचे म्हटले आहे.

Update: 2022-03-09 03:27 GMT

राज्यात महाविकास आघाडी विरुध्द भाजप सामना रंगला आहे. त्यातच ईडीने महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांना अटक केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवत भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला होता. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहीले होते. तर त्यामध्ये राज्यातील सरकार पाडण्यासाठी भाजपकडून दबाव आणला जात असल्याचा गंभीर आऱोप केला होता. त्यावरून राहुल गांधी यांनी संजय राऊत यांना पत्र लिहीले आहे.

या पत्रात राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, मला आशा आहे की, या पत्रामुळे तुम्हाला बरे वाटेल. कारण तुम्हाला आणि तुमच्या सहकाऱ्यांना टार्गेट करण्यासाठी विविध तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. या घटनेचा मी निषेध करतो. तसेच तुमच्या पत्रातील आशयानुसार विरोधकांना नामोहरम करण्यासाठी मोदी सरकारकडून छळवणूक आणि धमकावण्याच्या घटना घडत आहेत. या घटना लोकशाही प्रक्रीयेला मोडीत काढण्याचा प्रकार आहे. त्यामुळे विरोधकांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळेच काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. तसेच तुमच्या अभिव्यक्तीला प्रामाणिकपणे पाठींबा देतो, असे राहुल गांधी यांनी संजय राऊत यांना लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे. तर हे पत्र 15 फेब्रुवारी 2022 रोजी लिहीले आहे.


या पत्रावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देतांना म्हटले आहे की, धन्यवाद राहुल गांधीजी, लोकशाही मुल्ये आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्याच्या या प्रयत्नात आपल्याला एकत्रित लढावे लागेल. कारण केंद्रीय तपास यंत्रणा विशिष्ट पक्षाच्या गुलाम असल्यासारखे वागत आहेत. तर हे देशासाठी दुर्दैवीच नाही तर धोकादायकही आहे. पण मला खात्री आहे की, हे संकटही पार पडेल, असे संजय राऊत यांनी म्हटले.



 


Tags:    

Similar News